लेखणी बुलंद टीम:
नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओत काही पोलीस कर्मचारी चक्क पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत. वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना देखील दिसत आहेत. पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ –
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पोलीसच पोलीस ठाण्यात जुगार खेळत असल्याचा एका व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/RbwP3WLDQ6
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2024