धक्कादायक! शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपीची आणि तरुणीची ३१ दिवसांपासून ओळख,त्यांच्यात एवढ्या रुपयांचा व्यवहार?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे खळबळजनक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्तात्रय गाडे हा 35 वर्षांचा असून तो शिरुरच्या गुनाट गावात राहतो. याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या. पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे, असा दावा अॅड. सुमीत पोटे यांनी केला आहे. घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला, असेही सुमीत पोटे यांनी सांगितले. मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

आरोपी आणि त्या सदर तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख
“आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली. आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे, त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख आहे. जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं, तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो, त्यानंतर ती येते. त्यानंतर अवघ्या ५० मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही. त्यानंतर ती स्वत:च्या गावाकडे गेली. यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली”, असे अॅड. सुमीत पोटे यांनी सांगितले.

“त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले आहेत. त्यावरुन त्यांचे वाद झाले. यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही. त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो, असे सांगितलं. तर तिने ऑनलाईन नको रोख हवे असं सांगितले. त्यामुळे त्याने रोख पैसे दिले. माझं आणि आरोपींचं युक्तीवादानंतर बोलणं झालं. त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेले नाही”, अशीही माहिती अॅड. सुमीत पोटे यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *