बिहार येथील बक्सार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणांसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला पळवून पळवून मारले आहे. एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याला जलेबी आणि कचोरी वाटण्यात आली होती. परंतु काही विद्यार्थ्यांना जलेबी आणि कचोरी मिळाले नाही.
त्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारहाण केली. शिक्षक जेव्हा घरी जात होते त्यावेळीस विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. रागाच्या भरात विद्यार्थ्यांनी शिक्षकाला पळवून पळवून मारले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बक्सर जिल्ह्यातील मुरार इंटर लेव्हल हायस्कूलमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे