धक्कादायक ! बदलापूरमध्ये मुलानेच केला बापचा खून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुलानेच आपल्या पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर शहरात उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली भागात सकाळी आठच्या सुमारास ही घटना समोर आली.

बदलापूरः मुलानेच आपल्या पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर शहरात उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली भागात सकाळी आठच्या सुमारास ही घटना समोर आली. सुरूवातीला पिता पुत्र संवाद साधत होते. त्यानंतर अचानक पित्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

नोकरदारांचे शहर असलेल्या बदलापूर शहरात सकाळी नोकरदार, विद्यार्थी यांची लगबग सुरू असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली. बदलापूर पश्चिमेतील बेलवली भागात हत्या झाल्याच्या बातमीने बदलापुरात खळबळ उडाली. बेलवली हा तसा मराठीबहूल परिसर आहे. रेल्वे स्थानक मार्गावर पवार कॉम्पलेक्सच्या प्रवेशद्वाराजवळच काही दुकाने आहेत. यातील एका दुकानात हा प्रकार घडला. येथे एक बिर्याणी विक्रेत्याचा व्यवसाय चालतो. हा दुकानाचा गाळा कराळे कुटुंबियांचा असल्याची माहिती मिळते आहे. या दुकानात मालक वडील अनंत कराळे आणि त्यांचा मुलगा गणेश कराळे सकाळी आले होते. सुरूवातीला ते गाळ्याच्या मागच्या बाजूला चर्चा करत होते. मात्र काही काळानंतर गणेश कराळे याने वडिल अनंत कराळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात अनंत कराळे यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती आसपासच्या नागरिकांना मिळताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पुढील विच्छेदनासाठी बदलापूर पूर्वेतील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येचे कारण तपासात स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *