धक्कादायक! पत्नीच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनियरची आत्महत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बेंगलुरू मध्ये Marathahalli भागात राहणार्‍या 34 वर्षीय एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना सोमवार 9 डिसेंबरची असून त्याने 40 पानी सुसाईड नोट लिहून हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मृत तरूण हा मूळचा उत्तर प्रदेश मधील आहे. त्याने सुसाईड नोट मध्ये आपल्याला पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं कारण देण्यात आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याला होत असलेल्या त्रासाची माहिती देणारा व्हिडिओ देखील एका NGO सोबत शेअर केला आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, Marathahalli police inspector Anil Kumar यांनी ही घटना सोमवार सकाळची असून त्याच्या आजुबाजूच्या लोकांनी पोलिसांना हा प्रकार कळवल्याचं म्हटलं आहे. पोलिस सकाळी 6 च्या सुमारास तेथे पोहचले. CV Raman Nagar Government Hospital मध्ये मृतदेहाची ऑटोप्सी झाली आहे. त्यानंतर काल कुटूंबियांना मृतदेह देण्यात आला आहे.

मृताच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृताच्या पत्नी आणि सासू व कुटुंबियांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कायदेशीर सेटलमेंट करण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा दावा आहे. तक्रारीवरून त्यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 लावण्यात आले असून तपास सुरू आहे.

सुसाईड नोट ही Save Indian Family Foundation सोबत व्हॉट्सअ‍ॅप वर शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याने मानसिक, आर्थिक जाचाची माहिती दिली आहे. त्याने न्यायासाठी भावनिक आवाहन केले आहे. तसेच आपल्या 4 वर्षाच्या मुलासाठी प्रेम व्यक्त केले आहे. त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्याला पोहचवाव्यात असंही त्याने म्हटलं आहे.
2019 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. मॅट्रिमोनी साईट वरून ते एकमेकांना भेटले होते. 2021 पासून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत होते. मृताच्या पत्नीने मुलासह बेंगलूरू मधील घर सोडलं होतं. त्यानंतर तिने पैसे मागण्यास सुरूवात केली. पैसे मिळत नसल्याने तिने खूनाचा प्रयत्न, हुंडा, लैंगिक अत्याचार अशा विविध कारणाखाली गुन्हे दाखल केले. त्याला एका वर्षात 40 कोर्टाच्या नोटीसा आल्या आहेत. त्यासाठी सतत त्याला बेंगलूरू -यूपी प्रवास करावा लागत होता. 120 दिवस तो प्रवास करत होता. यामुळे त्याला मानसिक आणि आर्थिकही त्रास झाला. यासाठी सतत कामावर सुट्ट्या घेणं त्याला जड जात होतं.

छळाच्या आरोपांव्यतिरिक्त, सुसाईड नोटमध्ये न्यायालयीन गैरवर्तनाच्या आरोपांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशासोबत देवाणघेवाण केली, असा दावा केला आहे. न्यायाधीशांनी त्याची थट्टा केली आणि त्याच्या चिंता फेटाळून लावल्या. त्याने असा आरोपही केला की न्यायाधीशांनी त्याच्यावर दाखल केलेल्या एका खटल्याचा निकाल देण्यासाठी 5 लाखांची मागणी केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *