अलिगडमधील एका घटनेची सध्या देशभरात चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे होणार्या जावयासह सासू पळून गेल्याची. जावयाची आणि सासूची प्रेमकहाणी सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हे दोघे कुठे पळून गेले हे पोलिसांना अद्याप समजलेले नाही, जरी त्यांचे शेवटचे ठिकाण उत्तराखंडमधील रुद्रपूरजवळ सापडले असले तरी अद्याप त्यांचा तपशील मिळू शकलेला नाही. दरम्यान, पळून गेलेल्या महिलेचा पती जितेंद्रने इतर अनेक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला.
आजाराच्या बहाण्याने प्रेम सुरू झालं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की, 1 मार्च रोजी त्याच्या पत्नीने सांगितले की, ती तिचा होणारा जावई राहुल आजारी असल्याने त्याच्या घरी जात आहे. जितेंद्रला वाटले होते की, त्याची पत्नी फक्त त्याच्या तब्येतीची विचारपूस करणार आहे, पण वास्तव काही वेगळेच निघाले. ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली.
ती परत आली, आणि दुसऱ्या दिवशी झाली फरार
पाच दिवसांनी, ती आपल्या गावी परतली पण राहुलसोबत. राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर निघून गेला. त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही, पण दुसऱ्या दिवशी दोघांनीही पळून जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
पोलिसांसाठी त्यांना शोधणं एक आव्हान
महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात बेपत्ता पत्नीची आणि जावयाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. डेप्युटी एसपी महेश कुमार म्हणाले की, उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करणारा राहुल हे दोघांचे शेवटचे ठिकाण होते. हे दोघेही बसने उत्तराखंडला गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांच्या मोबाईल नंबरच्या कॉल डिटेल्स आणि IMEI ट्रॅकिंगद्वारे त्यांचे अचूक स्थान लवकरच कळू शकेल. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
महिलेच्या पतीनं सांगितली हकीकत
दरम्यान, महिलेचा पती जितेंद्र कुमारने पोलिसांना सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या होणार्या जावयाला फोन केला, तेव्हा त्याने प्रथम सांगितले की, तुमची बायको माझ्यासोबत नाहीये. अनेक वेळा फोन केल्यानंतर त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. जितेंद्रने सांगितले की, नंतर जावयाने कबूल केले की हो, ती माझ्यासोबत आहे. तू तिच्यासोबत वीस वर्षे राहिलास, आता तिला विसरून जा. तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना जितेंद्र कुमार म्हणाले की, माझ्या पत्नीने मला माझ्या वहिनीकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी पाठवले होते. मुलीचे लग्न 16 एप्रिल रोजी ठरले होते. अशा परिस्थितीत कार्ड तिथे पोहोचवणे आवश्यक होते. माझ्या वहिनीला कार्ड देऊन मी घरी आलो, तेव्हा मला माझी बायको घरात नव्हती. काही काळासाठी असं वाटत होतं की ती एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली आहे. पण नातेवाईकांच्या ठिकाणी चौकशी करूनही तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही तेव्हा संशय अधिकच वाढला.
जितेंद्र पुढे सांगतात की, यानंतर मी फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यानंतर असे समोर आले की, ती तिच्या होणार्या जावयाशी तासनतास बोलत असे… तर महिलेची मुलगी म्हणाली की आईने आमच्या घरातील सर्व काही किमती सामान सोबत नेलं आहे. आम्हाला आमचे सामान परत करावं. बाकी ते जगो किंवा मरोत आम्हाला काही फरक पडत नाही.
हाती लागेल ती संपत्ती घेऊन सासूने होणाऱ्या जावयासोबत धूम ठोकली
अलिगढ जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातून हा प्रकार समोर आलाय. येथील एका गावातील एका वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न दादोन पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी ठरवलं होतं. त्यांचा विवाह 16 एप्रिल रोजी होणार होता. नातेवाईकांमध्ये पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र, लग्न 10 दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना नवरी मुलीच्या आईने प्रताप केला. चक्क होणाऱ्या जावयासोबत पळून जात लग्न केलं आणि घरातील संपत्तीही नेली. या घटनेमुळे व्यथित झालेली नवरी सतत रडत आहे. त्यामुळे त्या मुलीची प्रकृती बिकट झाली आहे. होणार्या नवरदेवाने त्याच्या वडिलांना फोनवर सांगितले की शोधण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही परत येणार नाही.
पोलिसांकडून पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु
मद्रक पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार माहिती देताना म्हणाले की, महिलेच्या पतीने लेखी तक्रार दिली आहे. यानंतर, महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि तिचा शोध घेतला जात आहे. तो मुलगाही त्या दिवसापासून बेपत्ता आहे. पण दोघेही कुठे एकत्र गेले आहेत की नाही हे स्पष्ट नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण घटना स्पष्ट होईल.
शिवानी असं नवरी मुलीचं नाव आहे. तिचं 10 दिवसांत लग्न होणार होतं. लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र, या सगळ्यात मोठा ट्विस्ट आला. शिवानीची आई नवरदेवासोबत पळून गेली. त्यामुळे शिवानीची प्रकृती खालावली आहे.