कोलकता ३१ वर्षीय डॉक्टरचा रेप आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे !

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

 

३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी ९ ऑगस्टला कोलकाताच्या आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात आढळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा अर्धनग्न मृतदेह पाहून लगेचच पोलिसांना बोलावण्यात आलं. एकीकडे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि दुसरीकडे सखोल चौकशीची मागणी करत डॉक्टरांनी संप पुकारला. केवळ कोलकाताच नव्हे तर देशभरात विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत असतानाच पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली, एका इअरबड्सच्या तुकड्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा कसा लावला याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

 

 कोलकातातील महिला डॉक्टरचा रेप आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले असून याचा तपास आता सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे.आरजी कर मेडिकल कॉलेजच्या (RG Kar Medical College) एका डॉक्टरने मोठा दावा केला आहे. मृत महिला डॉक्टरबरोबर आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावा या डॉक्टरने केला आहे. मारहाण करण्याऱ्या आरोपींमध्ये एक मुलीचाही समावेश असल्याचं या डॉक्टरचं म्हणणं आहे. तसंच हा पुर्ण कट कॉलेचे प्रिन्सिपल, वरिष्ठ डॉक्टर आणि संबंधित विभागातील प्रमुखांबरोबर इतर काही लोकांनी मिळून रचला होता, हे सर्व एक मोठं रॅकट चालवत असल्याचा गंभीर आरोपही या डॉक्टरने केला आहे. मृत महिला डॉक्टरला थीसिस जमा करण्याच्या नावाखाली टॉर्चर केलं जात होतं, असा दावाही या डॉक्टरने केलाय.

 

कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत  प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता एक मोठा दावा करण्यात येतोय. पण या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश होता, याचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान आरजी कर मेडिकल कॉलेजच्या एका महिला डॉक्टरची ऑडिओ क्लिप (Audio Clip Viral) व्हायरल झाली आहे. यात या महिला डॉक्टरने रेप आणि मर्डर प्रकरणात कॉलेजचे प्रिन्सिपल आणि इतर स्टाफवर गंभीर आरोप केले आहेत.

   

पास करण्यासाठी पैशांची मागणी करत

व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपमध्ये महिला डॉक्टरने सुरुवातील घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पुढे ती म्हणते ‘मित्रांकडून मला आरजी कर मेडकिल कॉलेजमधली घटना समजली. मला यावर विश्वास बसत नाहीए. पश्चिम बंगलाच्या जवळपास कर्व सरकारी मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल, विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पैशांची मागणी करतात. विद्यार्थ्यांना घाबरवलं जातं, पैसे दिले नाहीत तर थीसिस जमा करुन घेतली जाणार नाही, इंटर्न, कम्पीलिशन सर्टिफिकेट मिळणार नाही, तसंच डॉक्टरीचं रजिस्ट्रेशनही होणार नाही असं सांगितलं जातं’

मेडिकल कॉलेजमध्ये रॅकेट 

व्हायरल व्हिडिओत या महिला डॉक्टरने संदी घोषचं नाव घेतलं आहे. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर संदीप घोषचं मोठं रॅकेट असल्याचा आरोप तीने केलाय. काही इंटर्न, हाऊस स्टाफ यांच्या मार्फत हे रॅकेट चालवलं जातं. याशिवाय ते सेक्स रॅकेट आणि ड्रग्स रॅकटही चालवतात. कमी किंमतीत मिळणारी औषधं ड्रग्स म्हणून बाहेर विकली जातात. करोडो रुपयांचं ट्रेंडर निघतं, यात या रॅकेटचं कमिशन असतं असा गंभीर आरोपही या ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आला आहे.

सेमिनार हॉलमध्ये हे सर्व जण जेवत असताना त्यांच्यात भांडणं झाली. त्यावेळी त्यातल्या मुलीने पीडितेला धमकी दिली. त्यानंतर ती तिथून गेली आणि आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर दारू प्यायली आणि पुन्हा सेमिनार हॉलमध्ये येऊन पीडित मुलीवर हल्ला केला. दोघांनी तिचे हात पकडले, यात इंटर्न मुलीनेही त्यांना मदत केली असा आरोप ऑडिओत करण्यात आला आहे.

 

या हल्ल्यात मृत महिला डॉक्टरला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. मारहाण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर हे सर्वजण सेमिनार हॉलच्या बाहेर आले, तिथे अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉय हा दारू पित होता, त्याला या लोकांनी सेमिनार हॉलमध्ये काम असल्याचं सांगून पाठवलं. तिथे गेल्यानतंर संजयने मृतदेहवर अत्याचार केला आणि तिथून गेला, असा धक्कादायक दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *