धक्कादायक! कोल्हापूरमध्ये चालत्या एसटी बस मध्ये गळा आवळून एकाची हत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) चालत्या एसटी बस मध्ये गळा आवळून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेमध्ये पत्नी आणि नातेवाईकांना शिविगाळ करून त्रास देत असल्याने सासू- सासर्‍याने जावयाची हत्या केली आहे. यामध्ये मृत व्यक्तीचा मृतदेह एसटी स्टॅन्डच्या आवारात ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक देखील केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, CBS Stand परिसरामध्ये गुरूवार 26 सप्टेंबरच्या सकाळी एका व्यक्तीचा बेवारस स्थितीमध्ये मृतदेह सापडला. या मृत व्यक्तीचं नाव संदिप रामगोंडा आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तिथे धाव घेतली. त्याच्या जवळील कागदपत्रांवरून नाव समजले तर प्राथमिक अंदाजानुसार, पोलिसांनी या व्यक्तीचा गळा आवळून खून झाल्याचं म्हटलं आहे.दरम्यान संदीपचा मृतदेह त्यानंतर सीपीआर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फूटेज मध्ये मिळाले गुन्ह्याचे धागेदोरे
शाहुपुरी पोलिस स्टेशन कडे या घटनेचा तपास होता. त्यामध्ये खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक गेले असताना त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये रात्री 1 च्या सुमारास एक महिला आणि पुरूष यांनी संदिपचा मृतदेह आणून ठेवल्याचं दिसलं. कागदपत्रावरून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना संदिप हा शिरगावे असल्याचं समजलं. मात्र त्याला दारूचं व्यसन असल्याने आणि त्याचा त्रास मुलगा, पत्नीला होत असल्याने त्यांच्यापासून तो विभक्त झाला होता. त्याची पत्नी आणि मुलगा गडहिंग्लजला राहत असल्याचं पोलिसांना समजलं आहे.

पोलिसांनी संदीपचे सासरे हनमंत आप्पा यल्लाप्पा काळे आणि सासू गौरा हनमंतआप्पा काळे यांना अटक केली आहे. घटस्फोटानंतरही संदीप गडहिंग्लज ला येऊन पत्नी, मुलाला त्रास देत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *