न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांवर बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये पळवल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. बँकेच्या माजी महाव्यवस्थापकांनी शाखेच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांनी बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये काढले आहे. आरोपी माजी महाव्यवस्थापकाचे नाव हितेश प्रवीणचंद मेहता असल्याचे सांगितले जात आहे.

हितेश मेहता जेव्हा बँकेचे महाव्यवस्थापक होते तेव्हा ते दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी सांभाळत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यावेळी हितेशने आपल्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यांमधून १२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दादर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

तसेच माहिती समोर आली आहे की, या घोटाळ्यात हितेश मेहता आणि आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *