लेखणी बुलंद टीम:
काही मच्छिमार समुद्रात मासे पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना एका शार्क मासा आढळला ज्याची प्रकृती ठीक न्हवती. मच्छिमारांना वाटले की बहुधा शार्कने प्लास्टिक किंवा मासेमारीचे जाळे खाल्ले असावे, त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आहे. त्याला मदत करण्यासाठी मच्छिमारांनी शार्कच्या पोटात चीरा घातला तेव्हा जे बाहेर आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण शार्कच्या पोटातून एका महिलेचा मृतदेह बाहेर आला.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण इंडोनेशियाचे आहे. इंडोनेशियामध्ये मच्छिमारांना मासेमारी करताना एक शार्क सापडला, ज्याच्या पोटात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. मच्छीमारांना तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी जवळपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून शोध सुरू केला. तसेच तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की ही महिला 68 वर्षीय अमेरिकन कॉलीन मोनफोर आहे, जी तिच्या सहा मित्रांसह डायव्हिंगसाठी गेली होती. व 26 सप्टेंबर रोजी ती बेपत्ता झाली होती. तिच्या कपड्यांवरून तिची ओळख पटली.
तसेच कॉलीन बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या शोधासाठी डायव्हर्सची टीम तैनात केलीहोती. बरेच दिवस शोध सुरू होता, परंतु काहीही सापडले नाही तेव्हा शोध बंद करण्यात आला. पोलिसांना असा संशय आहे की शार्कशी तिचा सामना झाला असावा. व शार्क ने तिच्यावर हल्ला केला असावा.