उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पती-पत्नीमध्ये काही कारणामुळे भांडण झाले. भांडणानंतर संतापलेल्या पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं, तीने आधी पतीचा प्रायव्हेट पार्ट धारदार हत्यारानं कापला, त्यानंतर तीने अॅसिड पिलं, या घटनेत दोन्ही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हे प्रकरण संभल जिल्ह्यातल्या असमोली पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका गावामध्ये घडलं आहे. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं आहे.पत्नीने आधी धरादार शस्त्रानं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला, त्यानंतर तिने अॅसिड पिलं, या घटनेनंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना 21 मे रोजी घडली आहे. दरम्यान आता या प्रकरणात पत्नीने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पतीने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, तर दुसरीकडे या महिलेच्या भावानं हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि बळजबरी अॅसिड पिऊ घातलं अशी आपल्या बहिणीच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार पाच लोकांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे पतीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पती-पत्नीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं काय घडलं होतं? या प्रकरणात चूक कोणाची होती? याबाबतच सत्य लवकरच समोर येईल, आम्ही या पती-पत्नीची चौकशी सुरू केली आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
प्रकरणानं खळबळ
दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, पत्नीनं रागाच्या भरात चक्क आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे, तर समोर आलेल्या माहितीनुसार तिने स्वत: देखील अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, या घटनेत ते दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.