लेखणी बुलंद टीम:
उत्तर प्रदेशातील अमरोहा मध्ये एसआरएस इंटरनेशनल शाळेच्या स्कूल व्हॅन वर काहींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.दोन राऊंड फायरिंग सह या स्कूल व्हॅन वर दगडफेक देखील झाल्याचं समोर आलं आहे. चालकाने गाडी वेगाने चालवत शाळेमध्ये पोहचवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शाळेच्या मुख्यध्यापकांनी यानंतर पोलिसांना हा प्रकार कळवला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. या गोळीबारामागील कारणाचा तपास सुरू आहे.
पहा व्हिडिओ: