धक्कादायक! भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादातून पर्यटकांनी महिलेला अंगावर गाडी घालून चिरडले

Spread the love

लेखणी बुलंद टीम;

हॉटेल रुम मधील भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादातून एका महिलेला पर्यटकांनी अंगावर गाडी घालून चिरडल्याची घटना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ज्योती धामणस्कर असे मृत महिलेचे नाव आहे. पिपरी चिंचवड येथील काही पर्यटक हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास दाखल झाले होते. अभी धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे येऊन त्यांनी वास्तव्यासाठी रुमची विचारणा केली. यावेळी हॉटेल भाड्याच्या रकमेवरून त्यांचा आणि धामणस्कर यांचा वाद झाला. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर सर्वजण पळून जात असतांना ज्योती धामणस्कर त्यांना अडवण्यासाठी पुढे गेल्या मात्र त्यांना गाडीखाली चिरडून हे सर्व जण पसार झाले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांचा मृत्यू झाला आहे.

आसपासच्या गावकऱ्यांनी यातील एका पर्यटकाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. तर उर्वरीत जण गाडी घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेतील सर्व पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *