पोलिसांनी बाबा सिद्दिकींचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवला होता. वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या जबाबात झिशान सिद्दिकी वडिलांची हत्या वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच घडल्याचा दावा केला होता. तसेच, याप्रकरणात अदानी, बलवा आणि ओंकार बिल्डरसह भाजप नेते मोहित कंबोज यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. तर, हत्येचा एसआरएशी संबंध नसल्याचा पोलिसांकडून दावा करण्यात आला आहे. तसेच, बिष्णोई गँग अँगलवर पोलीस ठाम आहेत. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे चिरंजीव झिशान सिद्धीकी यांनी पोलीस जबाबात अनेक बिल्डिर्सप्रमााणेच भाजप नेते मोहीत कंबोज यांची नावं घेत संशय व्यक्त केला आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकीत विकासकांच्या नावांचा उल्लेख आहे.
झिशान सिद्दिकींच्या जबाबात मोहीत कंबोज यांचं नाव पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान यांनी वडिलांची हत्या वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच घडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा पुर्नविकास प्रकल्पाशी कोणताही संबध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, सिद्धीकी यांची हत्या बिष्णोई गँगकडून झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. या शिवाय झिशान सिद्धीकी यांनी आपल्या जबाबात मोहीत कंबोज याच्या नावाचा उल्लेख केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपपत्रात बाबा सिद्धीकी यांची हत्या सलमान खान याच्याशी असलेली जवळीकता यातूनच झाल्याचं म्हटलं आहे.
झिशान सिद्दिकी यांनी जबाबात काय म्हटलं?
वडिलांच्या हत्येनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं की, “12 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता मी घराबाहेर पडलो आणि संध्याकाळी 6:00 वाजता वांद्रे पूर्व येथील माझ्या ऑफिसमध्ये पोहोचलो, जिथे मी कार्यकर्त्यांसोबत माझ्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होतो. संध्याकाळी 7:00 वाजता माझे वडील बाबा सिद्दीकी माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले, मी त्यांच्याशी दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली, त्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, माझे वडील अँटी चेंबरमध्ये होते, जिथे त्यांनी इतर कामगारांशी बोलायला सुरुवात केली. रात्री 9:00 च्या सुमारास मला भूक लागली आणि मग मी माझे वडील बाबा सिद्दीकी यांना याबद्दल माहिती देण्यासाठी अँटी पेमेंट ऑफिसमध्ये गेलो पण ते तिथे नमाज पढत होते, म्हणून मी बाहेर आलो आणि काही वेळ माझ्या केबिनमध्ये बसलो. नंतर मी अँटी पेमेंट ऑफिसमध्ये गेलो. पुन्हा चेंबरमध्ये गेलो आणि विचारलं की, काही काम आहे का? नाहीतर मी जातो आणि 10 ते 15 मिनिटांत परत येतो. यानंतर, मी दानियल आणि आझम रिझवी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील संजय हॉटेलमध्ये गेलो, जे कार्यालयापासून थोड्या अंतरावर आहे. तिथे मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो. काही वेळानं दानियलला त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि तो मोठ्यानं ओरडला, “फायरिंग हुई है” त्यावेळी त्याला विचारलं कुणावर फायरिंग होत आहे, तो म्हणाला की, “बाबा भाईपर फायरिंग हुई है…” त्यानंतर, मी ताबडतोब माझ्या ऑफिसकडे पायी धावू लागलो. त्यावेळी माझ्यासोबत सिक्युरिटीसाठी असलेल्या पोलिसांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि नंतर आम्हाला कळलं की, वडिलांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे, मग आम्ही थेट लीलावती हॉस्पिटलकडे निघालो. गाडीत बसूनच मी माझ्या कार्यकर्त्यांशी फोनवर बोललो की, माझे वडील वाचतील ना? त्यावर कार्यकर्ता म्हणाला की, माझ्या वडिलांच्या शरीरातून खूप रक्त गेलंय. मी लीलावती रुग्णालयात पोहोचताच माझ्या आईला, बहिणींना याबाबत सांगितलं. त्यांना रुग्णालयात बोलावून घेतलं.