अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्याच्या शहरात असलेल्या चंद्रशेखर चौक परिसरातील वाडेकर गल्लीत हि घटना घडली. गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर असे आत्महत्या () केलेल्या पतीपत्नीचे नाव आहे. या दाम्पत्याचा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत होता. ज्याने 8 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली आहे. आपल्या मुलाचे दहाव्यासारखे धार्मिक अंतिम कार्य आटोपण्यापूर्वीच या दाम्पत्याने आयष्य संपवले . धक्कादायक म्हणजे त्यांच्या 16 वर्षी मुलाने दोन वर्षांपूर्वीच आत्महत्या केली आहे.
चौकोणी कुटुंबाचा करुन अंत
अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच प्रकारे अंत व्हावा, याबातब आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या बाजूला समाजात हळहळही व्यक्त होत आहे. वाडेकर कुटुंब हे परिसरात परिचित होते. मात्र, या कुटुंबात असे अचानक काय घडावे ज्यामुळे ठराविक कालावधीनंतर चौघांनीही आत्महत्या करावी? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. कौटुंबीक नैराश्येतूनच या कुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संगमनेर शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून कॉटेज हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.
आत्महत्येपूर्वी लिहीली चिठ्ठी
प्राप्त माहितीनुसार, वाडेकर दाम्पत्याच्या मृतदेहाजवळ दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या आढळून आल्या. ज्यामध्ये पुणे पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा वाकड परिसरात राहात होता. ज्याने आत्महत्या केली. त्याबद्दल वाकड पोलिसांबद्दल तीव्र नाराजी या चिठ्ठीमध्ये व्यक्त झाल्याची चर्चा परिसरात आहे.
वाडेकर दाम्पत्य संगमनेर नगरपालिकेच्या सेवेत
वाडेकर दाम्पत्य हे संगमनेर नगरपालिकेत नोकरीस होते. त्यापैकी गणेश वाडेकर हे अलिकडेच निवृत्त झाले होते. तर त्यांच्या पत्नी गौरी वाडेकर या पालिकेच्या आरोग्य विभागात सेवेत होत्या. त्यांच्या एका मुलाने संगमनेर येथेच राहत्या घरात दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या मुलानेही पुणे येथे आयुष्य संपवले. त्यामुळे वाडेकर दाम्पत्यास मोठ्या प्रमाणावर मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत असतानाच दाम्पत्याने आयुष्य संपवले असावे असे बोलले जात आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक तर्कवितर्क आणि चर्चांना उधान आले आहे. परिसरात घबराटीचे वातावरणही निर्माण झाले आहे. दरम्यान, आम्ही घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. तसेच, आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्या टाळण्यासाठी संपर्क
आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा उपाय नव्हे. त्यामुळे त्या मार्गाने जाणे टाळण्यासाठी कोणालाही 9152987821 क्रमांकावर संपर्क साधता येतो. ही एक icl-smallis सेवा आहे. जी दूरध्वनी आणि ईमेल आधारित समुपदेशन सेवा आहे. ही सेवा जी स्कूल ऑफ ह्यूमन इकॉलॉजी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेद्वारे चालविली जाते. जी भावनिक आणि मानसिक त्रासात असलेल्या व्यक्तींना, वय, भाषा, लिंग, लैंगिक या सर्वांसाठी मोफत टेलिफोन आणि ईमेल-आधारित समुपदेशन सेवा देते.