धक्कादायक ! जोडप्याकडून कॅब चालकाची हातोड्याने हल्ला, चादरीत गुंडाळून घरातच ठेवला मृतदेह

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

उलवे येथे एका कॅब चालकाची हातोड्याने हल्ला करत डोळे फोडल्याने (Crime News) या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीसह प्रियकरावर काल (रविवारी,6) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅब चालकाच्या हत्येनंतर (Crime News) दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेल्यानंतर तेथे त्यांच्या हातून घडलेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला आहे.(Crime News)

मोहगावात राहणाऱ्या संजय पांडे (वय 44) यांची निर्घृण हत्या (Crime News) झाल्याची घटना काल (रविवारी) उघडकीस आली आहे. तीन दिवसांनी त्यांच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. डोक्यावरती निर्घृणपणे हातोडीचे घाव घालून, आणि त्याचे डोळे फोडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता. ही हत्या 2 एप्रिलला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिया सरकन्यासिंग (वय 19 वर्षे) व तिचा प्रियकर विशाल शिंदे (वय 21 वर्षे) यांनी ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिया, विशाल हे दोघे पांडेच्या कॅबमधून नियमित पुण्याला जात असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. मात्र, घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे विशाल आला होता. कॅबचालक पांडे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याचीच कार व मोबाइल घेऊन दोघेही पुण्याला आले. मात्र, तिथे त्यांच्याकडून अपघात झाल्याने संबंधित वाहनचालक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळून गेले.

दोघांनी दिली खुनाची कबुली
पुण्यातील अपघातानंतर चकवा देऊन पळून गेले, मात्र, शनिवारी रात्री नाशिकमध्येही त्यांच्याकडून अपघात झाल्यानंतर ते दोघे पोलिसांना सापडले. कार मालकाबद्दल केलेल्या चौकशीत त्यांनी कॅबचालक पांडेच्या हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. नाशिक पोलिसांनी याबाबत कळवले असता पांडेच्या घरझडतीमध्ये मृतदेह मिळाल्याचे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहूल यांनी सांगितले आहे.

कार चालविता येत नसल्यामुळं अपघात
कॅबचालक पांडेची कार घेऊन दोघे पळून गेले असता त्यांना कार चालवता येत नसल्याने त्यांच्याकडून पुण्यात अपघात झाला. यावेळी समोरील वाहनधारक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. मात्र, त्यांना चकवा देऊन ते नाशिकला पळाले. तिथेही त्यांच्याकडून अपघात झाला त्यानंतर ते पोलिसांच्या हाती लागले. गाडी पांडेच्या नावावर असल्याचे चौकशीत समोर आले असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर उलवे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *