नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी चौकशी समितीसमोर तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या केंद्राकडून गुरुवारी पीडित तरुणीसह अन्य विद्यार्थिनींना चौकशीसाठी बोलविण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राअंतर्गत तक्रार समिती आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीमार्फत ही चौकशी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थिनींपैकी 10 विद्यार्थिनीनी सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी दाखल केली आहे.
नायर रुग्णालय विनयभंग प्रकरण उघडकीस आलं आहे. निलंबित डॉक्टरच्या विरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली आहे. प्राध्यापकाच्या विरोधात विनभंगाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून सुरु झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राने नायर रुग्णालयातील 10 विद्यार्थिनींची चौकशी केली. या विद्यार्थ्यांनी संबंधित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली.
सहाय्यक प्राध्यापक डॉ. भेटे यांची बदली दुसरीकडे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र मुंबई महापालिकेने या सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित केलं. सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे.