राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा बलात्काराची (Rape) खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका तरुणाला भेटण्यासाठी पीडित महिला भारतात आली होती. यावेळी त्या तरुणाने हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ब्रिटीश तरुणीने आणखी एका तरुणावर विनयभंगाचा आरोप केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीसोबत सोशल मीडियावर झाली ओळख –
पीडित महिलेने दिल्ली पोलिसांना सांगितले की, तिचे त्या तरुणाशी संभाषण सोशल मीडियावरून सुरू झाले. यानंतर पीडिता त्याला भेटण्यासाठी भारतात आली. या तरुणीने दिल्लीतील महिपालपूर येथील एका हॉटेलमध्ये खोलीही बुक केली होती. मंगळवारी तो तरुण आणि मुलगी दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले. तथापि, काही वेळाने मुलीला वाटले की, तो तरुण तिच्यासोबत चुकीचे वागण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर आरोपी तरुणाने मुलीवर बलात्कार केला. तथापि, तरुणाने पिडितेवर बलात्कार केल्यानंतर तिने आरडाओरड केली आणि ती हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचली. त्यानंतर दुसरा तरुण तिला लिफ्टमधून खोलीत घेऊन जात असताना, त्याने पीडितेचा विनयभंग केला.
दोन्ही आरोपींना अटक –
पोलिसांनी आरोपी कैलाशला बलात्काराच्या प्रकरणात अटक केली असून त्याचा मित्र वसीम याच्यावर पीडितेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. कैलास एका खाजगी कंपनीत काम करतो असे कळते. महिलेने पोलिसांना सांगितले आहे की, कैलाशला इंग्रजी बोलता येत नाही आणि त्याने तिच्याशी संवाद साधण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला.
पीडितेवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तथापि, पोलिसांनी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तालयालाही या घटनेची माहिती दिली आहे.