धक्कादायक! 40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या नदीत पडली, 14 जणांचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही.

 

तनहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, यूपी एफटी 7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

पहा व्हिडीओ:

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *