लेखणी बुलंद टीम:
महाराष्ट्रातील मुंबईमध्ये पवई पोलीस स्टेशनमध्ये आदित्य पंडित नावाच्या तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य त्याच्या प्रेयसीचा मानसिक छळ करायचा, असा तरुणावर आरोप आहे.
तसेच या आरोपीच्या सृष्टी असून ती एअर इंडियामध्ये पायलट होती. आदित्य सृष्टीवर आपल्या पद्धतीने राहण्यासाठी, जगण्यासाठी आणि खाण्यासाठी दबाव टाकत होता, असा आरोप असून या आरोपी तरुणाने तरुणीला 12 दिवसांसाठी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले असता तिने 13व्या दिवशी तरुणाला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार आदित्य पंडित आणि सृष्टी तुली हे दोघेही दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तरुणाने तरुणीला 12 दिवसांसाठी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले होते. यामुळे तिने नाराज होऊन 25 नोव्हेंबरच्या रात्री आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.