धक्कादायक ! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. नीलकृष्ण निलेश किन्हीकर असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. नववीत शिकणाऱ्या नीलकृष्णने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी या विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांनी शाळेत सोडले आणि थोड्याच वेळात शाळेतून विद्यार्थ्याच्या घरी फोन आला.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. नीलकृष्णच्या या पावलामुळे शाळेत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. नीलकृष्ण यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर आता विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा, शाळेचा किंवा कुटुंबाचा ताण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन नंबरसाठी मदतीचे आवाहन

टेली मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस – + 91 80 26995000 / 5100 / 5200 / 5300 / 5400; पीक माइंड – 080-456 87786; वंद्रेवाला फाउंडेशन – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – 080-23655557; आयकॉल – 022-25521111 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे) – 0832-2252525.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *