धक्कादायक! सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्यात चिमुरड्या मुलीवरील अत्याचाराची मालिका सुरुच असून आता सांगलीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय नराधमाने 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर
दुसरीकडे, आटपाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका जीम चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आरोपी सध्या जेलमध्ये असतानाच या अल्पवयीन मुलीवर चार दिवसांपूर्वी तीन अज्ञातांकडून कटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले. मुलगी भांडी घासत असताना मुलीवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याची मुलीच्या कुटुबीयांनी तक्रार दिली आहे.

घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर पोलिसांना सापडले. आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत हल्ल्यात वापरलेला कटर ताब्यात घेतलं आहे. मात्र, पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला ? व कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?
आटपाडी तालुक्यात मागील गेल्या काही दिवसांपूर्वी एका जिम चालक व खाजगी परिचारिकेने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती गाडीत बसवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्रा लेंगरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *