धक्कादायक! नागपूरमध्ये आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 देवलापर वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानंतर वन विभागही गोंधळलेला आहे. वाघाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजता वनपरिक्षेत्र देवलापर येथे वन कर्मचारी गस्त घालत होते. वन कर्मचाऱ्यांना मुनारा क्रमांक ८ जवळ वांद्रे कक्ष क्रमांक २७५ पीएफ येथे कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह दिसला. वाघाचा मृतदेह आढळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणाच्या २ किमीच्या परिघात तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान, वाघाची बेकायदेशीर शिकार केल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तसेच वाघाचे शवविच्छेदन देखील करण्यात आले.

तपासणीसाठी पाठवलेले नमुने
वाघीचा मृतदेह खूपच कुजला होता. त्यामुळे त्याचे लिंग निश्चित करता आले नाही. वाघाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तपासानंतर, वाघाचे वय, लिंग आणि मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट होईल. सहाय्यक वनसंरक्षक पुढील तपास करत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *