हरियाणातील गुरुग्राममधील (haryana Gurugram Crime News) मेदांता रुग्णालयामध्ये आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेनंतर, रुग्णालयातील लॅब टेक्निशियनला पोलिसांनी (haryana Gurugram Crime News) अटक केली आहे. एसआयटीच्या तपासामध्ये 800 सीसीटीव्ही फुटेज आणि 50 पेक्षा अधिक कर्मचारी व डॉक्टरांची चौकशी करण्यात आली, ज्यामुळे आरोपीचा शोध लागला. या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जातआहेत.(haryana Gurugram Crime News)
हरियाणातील गुरुग्राममध्ये एका खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळालं आहे. मोठ्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासल्यानंतर 8 पोलिस पथकांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून रुग्णालयात टेक्नीशियन म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी आरोपीची ओळख दीपक (वय 25) अशी आहे, जो बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बधौली गावचा रहिवासी आहे. चौकशीदरम्यान, आरोपी गेल्या 5 महिन्यांपासून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत असल्याचे उघड झाले.
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला
एका महिलेने 14 एप्रिल (सोमवार), 2025 रोजी गुरुग्राम पोलिस ठाण्यात 5 एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात झालेल्या लैंगिक छळाबद्दल तक्रार दाखल केली. ज्यावर गुरुग्राम येथील सदर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश
लैंगिक छळाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, गुरुग्रामचे पोलिस आयुक्त विकास कुमार अरोरा आयपीएस यांनी एक विशेष पोलिस पथक स्थापन केले आणि आरोपींना ओळखून अटक करण्याचे आदेश दिले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, गुरुग्राम येथील पोलीस उपायुक्त डॉ. अर्पित जैन यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण 8 स्वतंत्र पोलीस पथकांना विशेष सूचना देण्यात आल्या आणि आरोपाशी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी तैनात करण्यात आले. या पोलिस पथकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, रुग्णालयात बसवलेल्या 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वरील घटनेबद्दल चौकशी करण्यात आली.
आरोपी रुग्णालयात काम करत होता
आरोपीच्या प्राथमिक पोलिस चौकशीत असे दिसून आले की, तो गेल्या पाच महिन्यांपासून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार आयसीयू मशीन टेक्निशियन म्हणून काम करत होता. या कृत्याच्या २ दिवस आधी त्याने एक पॉर्न फिल्म पाहिली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस पथक पुढील कारवाईसाठी आरोपीला आज (शनिवारी) न्यायालयात हजर करणार आहे.
चौकशीत मोठी माहिती समोर आली आहे, त्यामध्ये पीडित महिला TPA अंतर्गत रुग्णालयात दाखल झाली होती, तिने सुमारे 4 लाख रुपयांचे बिल भरले गेले आहे. तिली पाच वर्षांची मुलगी आहे, तर तिचा पती राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर नराधम आरोपीचा शोध लागला आहे.