लेखणी बुलंद टीम:
मुंबई : शुक्रवारी रात्री भेंडी बाजार परिसरात असलेल्या कार्यालयात एका 52 वर्षीय व्यावसायिकाने स्वत:वर पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. इक्बाल मोहम्मद सिवानी असं या व्यावसायिकाचं नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून फाटलेल्या सुसाइड नोटचे तुकडे जप्त केले आहेत, ज्यामध्ये सिवानी यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, इक्बाल सिवानी हा माझगावचा रहिवासी असून तो भेंडीबाजार येथील अमानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आयात-निर्यातीचा व्यवसाय करत होताय सुमारे एक कोटी रुपयांच्या कर्जामुळे त्याच्यावर प्रचंड आर्थिक ताण होता.
सिवानी यांनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते. जेजे मार्ग पोलिसांनी कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांसह सात जणांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीदरम्यान कुटुंबियांनी उघड केले की सिवानी गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्याने त्रस्त होता. कुटुंबियांना आणि त्याच्या मानसिक स्थितीची जाणीव होती .