धक्कादायक! पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जालना जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू झाला आहे. शनिवार (22 फेब्रुवारी) पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर रिचवल्याने 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. यात एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा समावेश आहे. (Jalna Accident)

पुलाच्या कामासाठी गेलेल्या मजूरांच्या पत्र्याच्या शेडवर गाढ झोपेत असताना वाळूच्या टिप्परमधून वाळू रिकामी झाली. या वाळूने पत्र्याचे शेड खचून 7 मजूर वाळूत गाडले गेले. यात 5 मजूरांचा वाळूच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाला. दोन जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडली असून घटनास्थळी पोलीसांसह स्थानिक ग्रामस्थ पोहोचले होते.

नक्की घडले काय?
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे कामगार पुलाशेजारीच पत्र्याचे शेड बांधून राहत होते. पहाटे गाढ झोपेत असताना एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या शेड वरच वाळू रिकामी केली. या वाळूमुळे पत्राचा शेड खचून त्या वाळूत 7 मजूर गाडले गेले. काही वेळाने ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नानंतर एका महिलेसह तेरा वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र पाच मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ आहे.जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी गावातील ही घटना असून शनिवारी (२२) पहाटे साडेचार वाजता पूल बांधकामाच्या शेजारी राहत असलेल्या कामगारांच्या घरावर वाळूचे टिप्पर रिकामे झाले. वाळूच्या ढिगार्‍यात सात जण अडकले. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात मजुरांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. 5 मजुरांचा मृत्यू झाला असून तेरा वर्षीय मुलगी आणि एका महिलेला वाचवण्यात यश आल्याची माहिती जालना पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *