धक्कादायक!गणपतीचे विसर्जन करताना नदीत बुडून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

पाटण शहराजवळील सरस्वती नदीत (Saraswati River) गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) वेळी एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शितल प्रजापती (37), तिची किशोरवयीन मुले दक्ष (17) आणि जिमित (15) आणि तिचा भाऊ नयन प्रजापती (30) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व पाटण येथील वेराई चकला परिसरातील रहिवासी होते.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी 5 च्या सुमारास घडली. विसर्जन सोहळ्यादरम्यान नदीच्या जोरदार प्रवाहात सात जण वाहून गेले. मात्र, रहिवाशांना तात्काळ दोन पुरुष आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले. परंतु, प्रजापती कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, जिल्हा अधिकाऱ्यांनी व्यापक शोध आणि बचाव कार्य सुरू केले. जिल्हाधिकारी अरविंद विजयन यांनी सांगितले की, बेपत्ता कुटुंबातील सदस्यांना शोधण्यासाठी पाटण, मेहसाणा आणि सिद्धपूर येथून 15 गोताखोरांना पाठवण्यात आले. याव्यतिरिक्त, 15 ट्रॅक्टर आणि अर्थमूव्हर्स रात्रीच्या वेळी शोध क्षेत्रात त्यांचे हेडलाइट वापरण्यासाठी तैनात करण्यात आले होते.

रात्रभर अथक प्रयत्नानंतर, गुरुवारी पहाटे चार बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शोध आणि बचाव पथकांनी पीडितांना शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या घटनेमुळे गणेश विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या दुर्घटनेकडे लक्ष अधोरेखित करते. त्यामुळे गणेश विसर्जन करताना गणेश भक्तांनी संभाव्य धोक्यांपासून वाचण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *