लेखणी बुलंद टीम:
पुण्यातील एका शाळेतील 30 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे. शाळेने इयत्ता 5 ते 7 च्या सुमारे 350 विद्यार्थ्यांना नाश्त्यासाठी सँडविच दिले होते तेव्हा ही घटना घडली आहे.
पोलीस अधिकारी म्हणाले की, “सँडविच खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते आजारी पडले. रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांची आता प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एकूण 30 विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येणे, पोटदुखी, उलट्यांचा त्रास सुरु झाला व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आता या सर्वांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती मिळाली आहे.