मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 20 वर्षीय तरुणाने 78 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या वरुन उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या जबाबाच्या आधार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटीच राहत होती. घरात सीसीटीव्ही केमेरा बसवण्यात आला आहे.कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, महिलेला स्मृतिभृंश आणि स्मरणशक्ति कमी झाली आहे. ती घरात एकटीच असायची झोपलेली असताना आरोपीने घरात शिरुन तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाला.
हा सर्व प्रकार घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 64(1) आणि 332(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.