16 वर्षांच्या मुलाला शाळेच्या क्रिकेट संघात सामील व्हायचे होते. परंतु अंतिम निवडीतुन त्याला बाहेर काढण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या शाळेच्या संघात निवड व्हावी म्हणून मुलाने त्याच्या पालकांना त्याची शाळा बदलण्यास सांगितले होते, शक्यतो . मात्र आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर मुलाने आत्महत्या केली. इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याने उत्तर बेंगळुरूमधील हेन्नूर येथील गेद्दलहल्ली येथे त्याच्या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना त्यचा मृतदेह अपार्टमेंटच्या मागील बाजूस आढळल्याने ही घटना उघडकीस आली. मृताचे वडिल इंजिनियरअसुन आणि आई गृहिणी आहे. मृत हा एकुलते एक अपत्य होते.
पोलिसांनी सांगितले की, “शालेय क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे मुलगा नाराज होता. त्याने त्याच्या पालकांना त्याला दुसऱ्या शाळेत पाठवण्यास सांगितले होते. मात्र, त्याच्या पालकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की, शैक्षणिक वर्षाच्या मध्यात हे योग्य नाही. शाळा बदलण्यासाठी रविवारी सकाळी मुलाने पुन्हा पालकांशी वाद घातला आणि घर सोडले.
दुपारी त्याच्या आई-वडिलांनी त्याला त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि तो संध्याकाळ किंवा रात्री परत येईल असे त्याने सांगितले. मात्र, तो रात्री आला नाही. तो मित्राच्या ठिकाणी झोपला असेल, असे वाटून त्याचे आई-वडील झोपी गेले.” दरम्यान, मुलगा पहाटे 1:30 वाजता परतला आणि सातव्या मजल्यावरील टेरेसवर गेला आणि उडी मारली.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक: