पुण्यातील स्वारगेट बस आगारामध्ये काही दिवसांपुर्वी एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्य हादरलं होतं. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावरती हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण झाल्यानंतर दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दत्ता गोडेचे वकील वाजीद खान यांचे साहिल डोंगरे सहायक वकील आहेत.