दसरा (Dussehra 2024) हा हिंदू धर्मियांचा एक प्रमुख सण आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला हा साजरा केला जातो. भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला आणि देवी दुर्गाने नऊ रात्री दहा दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा पराभव केला, असे मानले जाते. असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दसऱ्याच्या दिवशी, म्हणजेच उद्या मुंबईमध्ये शिवसेना (UBT) चा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. हा मेळावा आणि दुर्गादेवी विसर्जन हे दोन प्रमुख कार्यक्रम पाहता, मुंबई वाहतूक पोलिसांनी शनिवारसाठी बहातुक निर्बंध जारी केले आहेत.
शिवसेना (UBT) आपला दसरा मेळावा दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क येथे आयोजित करणार आहे, ज्यात मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यत्यय अपेक्षित आहे. शिवाजी पार्क परिसरात दसऱ्याच्या दिवशी सकाळी 9 ते मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू असतील.
मुंबई वाहतूक निर्बंध-
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर (प) येथे दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने बस आणि कारकरिता खालीलप्रमाणे पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
दसरा मेळाव्याकरीता नागरीकांना घेवून येणाऱ्या वाहनांची पार्किग व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे-
पश्चिम उपनगरे-
पश्चिम उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करतील-
बसेससाठी पार्किग-
सेनापती बापट मार्ग- सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई
कामगार मैदान- सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई 12
कारसाठी पार्किग-
इंडिया बुल- 1 सेटर- इंडिया बुल फायनान्स सेंटर सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई
कोहिनूर स्क्वेअर- कोहिनुर स्क्वेअर, कोहिनुर मिल कंम्पा. दादर पश्चिम मुंबई
पुर्व उपनगरे-
ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करतील-
बसेससाठी पार्किंग-
पाच गार्डन माटुंगा- लेडी जहांगीर रोड, माटुंगा (पू) मुंबई
नाथालाल पारेख मार्ग- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा (पू) मुंबई
एडनवाला रोड- एडनवाला रोड, माटुंगा (पू), मुंबई
आर. ए. के. रोड- आर. ए. के. चार रस्ता वडाळा (प)
मुंबई शहरे व दक्षिण मुंबई-
वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने रविंद्र नाटय मंदिर येथे लोकांना उतरवून खालील ठिकाणी पार्क करतील-
बसेससाठी पार्किग
आप्पासाहेब मराठे मार्ग- आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई
कारसाठी पार्किग
इंडिया बुल 1 सेंटर- ज्युपिटर मिल कंम्पा. सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन (प), मुंबई 13