गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं हे भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. तर अर्थ खातं हे अजित पवारांकडे जाणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले नगरविकास खाते यंदाही त्याच पक्षाकडे राहणार असून स्वतः एकनाथ शिंदे हे त्या खात्याचे मंत्री (Urban Development Minister) असतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदे हे गृह आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही होते. पण गृहखाते त्यांना देण्यास भाजपने नकार दिला. त्यानंतर आता नगरविकास खातं आणि भाजपकडे असणारे गृहनिर्माण खातं हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. यापैकी नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल अशी माहितीही आहे.
कसे असेल संभाव्य खाते वाटप?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहेत अशी माहिती आहे.
भाजप-
गृह
महसूल
सार्वजनिक बांधकाम
पर्यटन
ऊर्जा
———
शिवसेना-
नगरविकास खातं
गृहनिर्माण
———
राष्ट्रवादी–
अर्थ
महिला आणि बालविकास
उत्पादन शुल्क
ही बातमी वाचा:
महायुतीचे खातेवाटप ठरलं! ‘अर्थ’ अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती