राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत ९ जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.