रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफचा ‘हा’ मोठा निर्णय

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बॉलिवूडचा नामवंत अभिनेता सैफ अली खान याच्याासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी गेला आठवडा अत्यंत थरारक आणि तणावाचा हौता. गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्री सैफ-करीनाच्या वांद्रे येथील इमारतीतील 12 व्या मजल्यावरील घरात चोर घुसला. पैशांची मागणी करणाऱ्या त्या चोराने सैफ अली खान आणि त्याच्या घरातील केअरटेकरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सैफवर 6 वार झाले, त्यानंतर तो चोर पळून गेला. जखमी झालेल्या रक्तबंबाळ सैफला तातडीने लीलावतीमध्ये दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे 4-5 तास झालेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांन त्याच्या पाठीतून चाकूचा एक तुकडाही बाहेर काढला. सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे खुद्द डॉक्टरांनींच सांगितलं.

सुमारे आठवडाभर रुग्णालयात घालवल्यानंतर आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार आहे. आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असून या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता सैफ अली खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. सैफ-करीनाच्या सद्गुरू शरण या इमारतीमध्ये चोर घुसून त्याने हल्ला केला होता. त्यामुळे आता त्या घरी सध्या परत न जाण्याचा निर्णय सैफने घेतल्याचे समजते. लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या जुन्या घरी परत जाणार नाही, तर तो दुसरीकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे.

कुठे राहणार सैफ करीना ?

सैफची प्रकृती आता ठीक असली तरी त्याला बेड रेस्टचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आज दुपारी त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असून त्यानंतर सैफ अली खान हा फॉर्च्युन हाईट्स या इमारतीमध्ये शिफ्ट होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानचे सामान सतगुरु शरण येथून फॉर्च्युन हाइट्समध्ये शिफ्ट केले जात आहे. सैफचे दुसरे घर वांद्रे येथील फॉर्च्युन हाइट्समध्ये आहे. आता काही दिवस तो फॉर्च्युन हाईट्समध्ये राहणार आहे.

याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सैफ अली खानचे ऑफिस आणि दुसरे घरही याच इमारतीत आहे. डॉक्टरांनी सैफ अली खानला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सैफ अली खान आता त्याचे जुने घर सतगुरु शरण ऐवजी फॉर्च्युन हाईटवर शिफ्ट होऊ शकतो. सैफ-करीनाच्या जुन्या घरातील काही वस्तूही या नवीन घरात शिफ्ट करण्यात आल्या आहेत.

सैफच्या हल्लेखोराला अटक

फवर हल्ला करणाऱ्या आरोपीच नाव शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहील्ला अमीन फकीर असं त्याचं नाव आहे. भारतात तो विजय दास हे नाव धारण करु राहत होता. रविवारी पहाटे त्याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली. कोलकात्ताचा निवासी असल्याच सांगून त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मूळ बांगलादेशचा रहिवासी असून काही वर्षांपासून अवैधरित्या भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *