सचिन तेंडुलकरच्या मुलाने ‘या’ मुलीसोबत गुपचूप केला साखरपुडा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा, क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar Engagement) याचा साखरपुडा सानिया चांडोक (Sania Chandok) हिच्यासोबत झाला आहे. सानिया या मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात असून, लवकरच तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे. हा साखरपुडा पूर्णपणे खाजगी पद्धतीने, फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती इंडिया टूडेच्या वृत्ताने दिली आहे.

कोण आहे सानिया चांडोक? (Who Is Sania Chandok)
25 वर्षीय अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकशी झाला आहे. सानिया ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. अर्जुनची साखरपुडा अतिशय गुपचूप पार पडला. सानिया अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. सानियाचे वडील रवी घई हे देखील सचिन तेंडुलकरचे मित्र आहेत.साखरपुडा समारंभ फारसा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्रच या कार्यक्रमाला उपस्थित होते. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींचे कुटुंब आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आइस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सच्या माहितीनुसार सानिया चांडोक ही डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून Mr.Paws Pet Spa and Store LLP कार्यरत आहे.

आयपीएलमधून मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतो अर्जुन तेंडुलकर-
अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरने 2023 रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने 13 धावा केल्या आहेत आणि तीन विकेट घेतल्या आहेत. तथापि, अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने एका षटकाराच्या मदतीने 9 चेंडूत 13 धावा केल्या. अर्जुनने 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2025 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द-
अर्जुन नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीतही फलंदाजी करू शकतो. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामने, 18 लिस्ट ए सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 532 धावा केल्या आहेत आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने लिस्ट ए मध्ये 102 धावा आणि 25 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 मध्ये अर्जुन तेंडुलकरने 119 धावा केल्या आहेत आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *