रशियाचा युक्रेनवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

रशिया युक्रेन युद्ध आणखी गंभीर वळणावर येऊन पोहचले आहे. युक्रेनच्या ऑपरेशन स्पायडर वेबला रशियाने उत्तर दिले आहे. रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. रशियाने युक्रेनवर अनेक दिशांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहे. रशियाने एकाच वेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात युक्रेनची किती नुकसान झाले? त्याची माहिती समोर आली नाही.

सीएनएनच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे की, रशियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून युक्रेनवर अनेक दिशांनी हल्ला केला आहे. हवाई दलाकडून ही माहिती त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर शेअर दिली आहे. रशियाच्या हल्ल्यादरम्यान राजधानी कीवमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले. कीव शहर लष्करी प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेन्को यांच्या मते, रशियाकडून झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक इमारतींना आग लागली. सोलोम्यान्स्की जिल्ह्यातील एका उंच इमारतीचे नुकसान करून निवासी क्षेत्रांना रशियाने लक्ष्य केल्याचा आरोप तकाचेन्को यांनी केला आहे.

दरम्यान, रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे कीवचे महापौर विटाली क्लिट्स्चको यांनी लोकांना शेल्टरमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी होलोसिएव्हस्की आणि डार्निट्स्की जिल्ह्यात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, राजधानीच्या ओबोलोन भागात युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे मोठे नुकसान
युक्रेनने नुकतेच रशियावर हल्ला केला होता. युक्रेनच्या या हल्ल्यात रशियाचे मोठे नुकसान झाले होते. रशियाची 41 लढाऊ विमाने नष्ट झाली होती. तसेच टीयू-95, टीयू-22 आणि ए-50 या हवाई रडारलाही यूक्रेनने नुकसान पोहचवले होते. त्यानंतर रशियाने त्या हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.

युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहिली होती. त्यांनी या हल्ल्यावर चिंता व्यक्त करताना बदल्याची वाट पाहत आहेत, असे म्हटले होते. मेदवेदेव यांच्या वक्तव्यानंतर रशियाकडून युक्रेनवर मोठा हल्ला होईल, ही शक्यता व्यक्त केली जात होती.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *