रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ 1 मे 2026 ला होणार रीलीज; मुख्य पात्रांमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन यांच्याही नावाची समावेशअभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा 1 मे 2026 ला होणार रीलीज होणार आहे. आज त्याची घोषणा झाली आहे. या सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे सोबतच तो सिनेमाच्या दिग्दर्शनाची देखील जबाबदारी सांभाळत आहे. हा सिनेमा मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेतही रीलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख दिसणार आहेत.
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्र दिनी येणार