लेखणी बुलंद टीम:
गेल्या महिन्यात पडलेल्या पावसामुळे धरणसाठ्याच मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे आता शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे पूर्णक्षमतेने भरल्याचे समजते. मोडक सागर, तानसा आणि विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून उर्वरीत ४ धरणे ही लवकरच भरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे.
किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. मुंबई परिसरातही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ३ जलाशय पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर चार जलाशय कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागले होते.
हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये एकूण 95.27 टक्के पाणी साठा आहे. विहार – 100 टक्के, मोडक सागरमध्ये 100 टक्के, तानसा – 98.53 टक्के, तुलसी जलायशात 97.71 टक्के, अप्पर वैतरणा धरणात 94.27 टक्के, मध्य वैतरणा – 97.61 टक्के, भातसा – 93.23 टक्के भरले आहे. मोडकसागर, विहार ही धरण पूर्णक्षमतेने भरली आहेत, तर तानसा धरण कोणत्याहीक्षणी भरण्याची शक्यता आहे.
आता ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ३ तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.