‘या’ गंभीर आजारमुळे झाला रतन टाटा यांचा मृत्यू, जाणून घ्या ‘या’ आजाराची लक्षणे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते तर ते एक तेजस्वी व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती होते. देशातील प्रत्येक घरात टाटाची एकतरी वस्तू तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. रतन टाटा यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांनी नेहमीच भारतातील लोकांच्या गरजेनुसार व्यवसाय केला. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही रतन टाटा यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. वयानुसार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे परिस्थिती अधिक कठीण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना रक्तदाब कमी झाल्यामुळे हायपोटेन्शनचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक भाग हळूहळू काम करणे बंद झाले. त्यांना डिहायड्रेशनचा त्रासही होऊ लागला.

कमी रक्तदाब किती धोकादायक आहे?

जर तुमचा रक्तदाब 90/60 पेक्षा कमी असेल तर डॉक्टर त्याला कमी बीपी मानतात. कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाब दोन्हीचा धोका वाढत्या वयानुसार वाढतो. रक्तदाब कमी झाल्यामुळे वृद्ध लोकांमध्ये हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. बीपी अचानक कमी झाल्यामुळे मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशा स्थितीत चक्कर येणे, डोके दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

कमी रक्तदाबावर काय उपचार आहेत?

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल करायला हवेत.

भरपूर द्रव पदार्थाचे सेवन करावे.

दारू आणि सिगारेटपासून दूर राहा.

व्हायरल संसर्ग झाल्यानंतर अधिक द्रव पदार्थांचे सेवन करणे.

नियमित व्यायाम करणे.

खाली बसताना आणि उठताना काळजी घेणे.

सरळ उभे राहण्यापूर्वी पाय आणि घोटे थोडे स्ट्रेच करा.

झोपताना डोके उंच ठेवा.

जड वस्तू उचलणे टाळा.

दीर्घकाळ स्थिर राहणे टाळा

जास्त वेळ गरम पाण्याच्या संपर्कात राहू नका.

कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करा.

खाल्ल्यानंतर विश्रांती घ्या.

याशिवाय, कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर जेवणात मीठाचे प्रमाण वाढवण्याचाही सल्ला देतात. रक्तदाब वेगाने वाढवण्यासाठी चहा किंवा कॉफीसारखे कॅफिनयुक्त पेय घेण्याचाही सल्ला दिला जातो. कारण यामुळे रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *