प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर जयंत पाटलांना रामदास आठवलेंनी दिली ऑफर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं आहे. आता शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाच्या नेतृत्वाची धुरा दिली आहे. आज शशिकांत शिंदे यांनी पदभारही स्वीकारला आहे. अशातच आता जयंत पाटलांना महायुतीकडून ऑफर आली आहे. एका बड्या नेत्याने जयंत पाटलांनी महायुतीसोबत आलं पाहिजे असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रामदास आठवलेंनी दिली ऑफर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे असं आठवले यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आठवले?

पुढे बोलताना आठवले यांनी म्हटले की, ‘जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुतीत आणायला करायला तयार आहे’ असंही आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जयंत पाटील आठवलेंची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.

जयंत पाटलांनी पद सोडण्याचे संकेत दिले होते

जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी हे पद सोडणार असल्याचे संकेत दिले होते. ‘शरद पवार साहेबांनी मला खुप संधी दिली. माझ्याकडे पक्षाचे सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद राहीले. अखेर पार्टीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी. मला पदमुक्त करा ही माझी नम्र विनंती आहे. हा पक्ष शरद पवार साहेब यांचा आहे. त्यांनी यावर निर्णय घ्यायला हवा, आपल्याला खुप पुढे यायचे आहे’ असे पाटील म्हणाले होते.

कोण आहेत शशिकांत शिंदे ?

शशिकांत शिंदे यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला असून ते जावळी तालुक्यातील हुमगावचे रहीवासी आहे. त्यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेले शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदार संघात सक्रीय असून ते दोनदा आमदार झालेले आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *