वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेलालाही अटक झाली.वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.
अखेर आज (23 मे) पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली.सात दिवसांपासून मोकाट फिरत असलेला वैष्णवीचा नराधम सासरा आणि दीर यांना पोलिसांनी पहाटे बेड्या ठोकल्या. मात्र अटकेआधी हे दोघे तळेगाव परिसरातच होते हे उघड झालंय.
पोलीस आल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणल्याचं पाहायला मिळाले.पोलीस आल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणल्याचं पाहायला मिळाले.विशेष म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तब्बल सात दिवस हे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार आहेत असं पोलीस सांगत होते. मात्र हे दोघे शेजारी तळेगाव परिसरात फिरत होते, हॉटेलात मस्त जेवत होते. तरी पोलिसांना सापडत नव्हते हे खरोखर धक्कादायक आहे.वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झालीय.