राज ठाकरे आमच्या आघाडीत नाहीत- रमेश चैनिथला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी मतांच्या चोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यावरुन, इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने (MVA) जोरदार निदर्शने करत आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस (Congress) पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप होत आहे. या कार्यशाळेत बोलताना चैनिथला यांनी राज्यातील निवडणुकांबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. तर, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी दोन दिवसीय कार्यशाळेला दांडी मारल्याचं दिसून आलं. या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चैनिथला यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानेही संकेत दिले आहेत.

आघाडी होऊ शकते किंवा नाही
आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होऊ ही शकणार नाही, असे रमेश चैनिथला यांनी म्हटल्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर मोठं वक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. आघाडीबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ, दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही. मात्र, राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, असे रमेश चैनिथला यांनी म्हटलं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आहे. जोपर्यंत मोदी राहतील तोपर्यंत देशात स्वातंत्र राहणार नाही. विधानसभा निवडणुकांबाबत सगळ्यात पहिले महाराष्ट्र राज्याने आवाज उठवला होता, मतांची चोरी होत आहे. मतांच्या यादीत घोळ करून महाराष्ट्र आणि हरियाणामधील सत्ता भाजपने घेतली. मतदार याद्यात घोळ केला, त्यामुळे जोपर्यंत मोदी शाह आहेत तोवर देशात मोकळ्या भीतीमुक्त निवडणुका होणार नाहीत, असे चैनिथला यांनी म्हटले.

निडणूक आयोग भाजपच्या हातात
निवडणूक आयोग भाजपच्या हातात आहे, ते म्हणतील तसेच होईल. मालेगावमध्ये बॉम्ब फोडले, त्यांना निर्दोष सोडले, पोलिसांनी त्यांना सोडून दिले. देशाचे स्वातंत्र वाचवण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत, ते स्वतःसाठी नाही. पण, निवडणूक आयोग त्यांना उत्तर देत नाही. आता, काँग्रेसने जनजागृती सुरू केली आहे. ब्लॉक कमिटींमध्ये आपण हे सगळ काम लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. आपली विदेश नीती अपयशी ठरल्याने अमेरिका आपल्याला धमकी देते. काँग्रेस काळात कधी कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अशी धमकी देत नव्हते, त्याला उत्तर दिलं जात होतं. पण, आता कोणीही उत्तर देत नाही, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होणाऱ्या टॅरिफ वादावरही चैनिथला यांनी मोदींवर निशाणा साधला.

लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या
राज्याचे सरकार भ्रष्टाचारी आहे, मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं म्हणाले. मात्र, अजून ती झाली नाही. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. लवकरात लवकर निवडणुकीच्या घोषणा केल्या पाहिजे, तशी आमची मागणी आहे, असेही चैनिथला यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *