‘पुष्पा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाने ६ दिवसात केला ‘इतक्या’ कोटींचा आकडा पार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट ‘पुष्पा २’ चित्रपटगृहांमध्ये पैशांचा पाऊस पाडत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चांगली कमाई होत आहे. खेरतर रिलीजपूर्वी पुष्पा २ ने रेकॉर्ड तोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अशातच चित्रपटाने सहाव्या दिवशी ‘बाहुबली’ ला मागे टाकले आहे. मंगळवारी कमाई कशी झाली ते जाणून घेऊया.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी सिनेमाने १६४.२६ कोटी रुपयांची मोठी कमाई केली त्यामुळे आतापर्यंतचा सर्वाधिक बंपर ओपनिंग चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात सर्वात जलद ५०० कोटींचा टप्पा ओलांडण्याचा रेकॉर्डही केला आहे.

‘पुष्पा २’ ने सहाव्या दिवशी प्रचंड धमका

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’ ने सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ६२.६० कोटींची घसघशीत कमाई केली. मात्र तसे पाहायला गेल्यास सोमवारच्या तुलनेत या कलेक्शनमध्ये -१८.७०% ची घट झाली आहे, परंतु वीक डेज च्या मानाने ही कमाई वाईट नाही. सहाव्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वोत्तम कमाई केली आहे. यासह, चित्रपटाने ६ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘पुष्पा २’ ने आतापर्यंत एकूण ६४६.९६ कोटींची कमाई केली आहे. पुष्पा २ ने प्रभासच्या ‘बाहुबली २’ लाही मागे टाकले आहे. यापूर्वी बाहुबली २ हा आतापर्यंत सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘बाहुबली २’ ने सहाव्या दिवशी ६२.०० कोटींची कमाई केली होती.

पुढील लक्ष्य ‘कल्की २८९८ एडी’

या चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘जवान’ला सहाव्या दिवशीच इंडिया नेट कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. Sacnilk च्या माहितीनुसार, ‘जवान’ चित्रपटाचे लाइफटाईम इंडिया नेट कलेक्शन ६४०.२६ कोटी रुपये आहे, तर ‘पुष्पा २’ ने अवघ्या ६ दिवसांत या कलेक्शनला मागे टाकले आहे. इंडिया नेट कलेक्शनच्या बाबतीत सध्या फक्त ४ चित्रपट ‘पुष्पा २’ पुढे आहेत-

त्यात ‘कल्की २८९८ AD’: (६४६.३१ कोटी रु.)

‘RRR’: (७८२.२ कोटी रु.)

‘KGF Chapter २’: (८६९.७ कोटी रु.)

‘बाहुबली २’: (१०३०.४२ कोटी रु.) यांचा समावेश होतो.

जगभरात ६ दिवसात ९०० कोटींचा आकडा पार

या चित्रपटाने हिंदीमध्ये सर्वाधिक ३७०.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने जवळपास ९०० कोटींचा कलेक्शन पार केला आहे. अद्याप योग्य आकडेवारी समोर आली नसली ततरी चित्रपटाच्या कमाईचा ट्रेंड पाहता चित्रपटाने जवळपास ९४०.०० कोटींची कमाई केली आहे असे म्हणता येईल. या चित्रपटाने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने गेल्या वर्षी ९१६.०० कोटी रुपयांची कमाई केली होती तेवढीच कमाई केवळ ६ दिवसांत केली आहे.

पुष्पा 2 च्या पहिल्याच दिवशी चाहत्यांची प्रतिक्रिया नकारात्मक ?

‘पुष्पा २’ चे कलाकार

सुमारे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा’चा सीक्वल आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, श्रीतेज, जगपती बाबू, प्रकाश राज, सौरभ सचदेव यांसारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *