पुष्पाची जादू पूर्ण बॉक्स ऑफिसवर (Box Office) पसरली असून दररोज अनेक नवनवे विक्रम मोडीत काढत आहे. पुष्पा 2 फक्त दक्षिणेतच नाही, तर हिंदीतही कमाई करत आहे. पुष्पा 2 नं देखील शाहरुख खानच्या जवान आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 ला मागे टाकलं आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं कोणते रेकॉर्ड मोडलेत? पाहुयात एका क्लिकवर…
पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. या तिघांचाही अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे चित्रपटांची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे.
पुष्पा 2 नं मोडले जवानचे सर्व रेकॉर्ड
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 नं दुसऱ्या आठवड्यात शानदार कमाई केली आहे. चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात हिंदीमध्ये शानदार कमाई करणाऱ्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. 125 कोटींसह पुष्पा 2 पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या नंबरवर स्त्री 2-92.90 कोटी, तिसऱ्या नंबरवर गदर 2 (90.50 कोटी), चौथ्या नंबरवर अॅनिमल (87.50 कोटी), पाचव्या क्रमांकावर जवान (82.50 कोटींवर) आहे. पुष्पा 2 नं हिंदीच्या सर्वच्या सर्व मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.
बॉक्स ऑफिसवर किती कमाई?
पुष्पा 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 11 व्या दिवशी चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये या चित्रपटाचं कलेक्शन आता 900 कोटींवर पोहोचलं आहे. आता पुष्पा 2, बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडण्यात व्यस्त आहे. बाहुबली 2 नं भारतात 1030.42 कोटी रुपये कमावले होते. पुष्पा 2 ची कमाई 900 कोटींच्या पुढे गेली आहे. आता पुष्पा 2 बाहुबली 2 चा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे.