पंजाब पोलिसांकडून चाइल्ड पोनोग्राफी प्रसारित करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून बाल लैंगिक शोषण सामग्री पाहणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या रॅकेटचा पंजाब पोलिसांनी पदार्फाश केला आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती रामसरा फाजिल्का येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस स्टेशनमध्ये आयटी कायद्याच्या कलम 67B अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी ३९ उपकरणे जप्त केली असून पोलिसांनी ते फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवले आहे. विजयपाल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फाजिल्का येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये ५४ संशयितांची ओळख पटली आहे. तर एक जण इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर लाईल्ड पोनोग्राफी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलिसांनी या रॅकेटचा पदार्फाश केला. या गुन्ह्यात आणखी सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील आणखी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. सायबर गुन्हे पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्याचा तपास आणि तांत्रिक सहाय्य युनिट सुसज्ज आहे.

कायद्यानुसार, बाल लैंगिक शोषण (CSAM) पाहणे, वितरण करणे किंवा साठवून ठेवणे हा 67 (B) IT कायदा, २००० नुसार, POSCO कायदा १३ कलमनुसार फौजदारी गुन्हा आहे. त्याला पाच वर्षांपर्यंत कारावास आणि १० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *