मुंबई शहरात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, एका अभिनेत्रीचा समावेश

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुंबईत (Mumbai) पोलिसांनी शुक्रवारी एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश (Sex Racket Bust) केला आणि एका व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरातील पवई परिसरात एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका करण्यात आली, ज्यात हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचा समावेश आहे. अटक केलेल्या दलाल श्याम सुंदर अरोरा याने या सर्वांना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार, पवई पोलिसांनी गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचून दलालालाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिलांना वेश्याव्यवसायात ढकलल्याबद्दल श्याम सुंदर अरोरा नावाच्या एका पुरूषाला अटक केली.

चार अभिनेत्र्यांची सुटका –
या कारवाईत चार संघर्ष करणाऱ्या अभिनेत्रींना वाचवण्यात आले. ज्या अभिनेत्रींना वाचवण्यात आले त्यापैकी एका अभिनेत्रीने हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. आरोपी व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात बीएनएस आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ठाण्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश –
काही दिवसांपूर्वीच ठाणे शहरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी एका एजंटला अटक केली होती. ठाणे शहर पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) गेल्या आठवड्यात डायघरच्या गोठेघर फाटा परिसरात ही कारवाई केली. या कारवाईत दोन महिलांचीही सुटका करण्यात आली. एएचटीसीच्या वरिष्ठ निरीक्षक चेतना चौधरी यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर छापा

 

https://twitter.com/ians_india/status/1900634433272901946


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *