पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पाहणार एक खास चित्रपट

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजचं वेळापत्रक ठरलेलं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोज वेगवेगळ्या, महत्त्वाच्या बैठका सुरु असतात. पंतप्रधान मोदी वर्षभरात कधीही सुट्टी घेत नाहीत, कामात व्यस्त असतात. पीएम मोदी फिरायला गेल्याचे किंवा त्यांनी सिनेमा पाहिल्याच फारसं ऐकिवात नाही. पण आज संध्याकाळी पीएम मोदी खास वेळ काढून चित्रपट पाहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी 4 वाजता ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहणार आहेत. पीएम मोदी यांनी आधीच या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटात विक्रांत मैसी प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट गुजरातच्या चर्चित गोधरा कांडावर आधारित आहे. पीएम मोदी हा चित्रपट दिल्लीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये पाहणार आहेत.

‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट मागच्या महिन्यात 15 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पीएम मोदी यांनी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कौतुक केलं. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “एकदम योग्य, ही चांगली बाब आहे की, आता सत्य समोर येतय. सर्वसामान्य लोक ते पाहू शकतात. एक फेर नरेटिव काही काळासाठी असतं. शेवटी फॅक्टस समोर येतात” पंतप्रधान मोदी यांनी रि्टवीट करुन चित्रपटाच कौतुक केलं होतं. चित्रपटाबद्दल एका पत्रकाराने ही पोस्ट केली होती. वर्ष 2002 मधील गोधरा ट्रेन जळीत कांडावर हा चित्रपट आधारित आहे.

अमित शाह या चित्रपटाबद्दल काय म्हणाले?

फक्त पीएम मोदीच नाही, तर गृह मंत्री अमित शाह यांनी सुद्धा द साबरमती रिपोर्टच कौतुक केलं होतं. अमित शाह मागच्या महिन्यात 22 नोव्हेंबरला चित्रपटाच्या मेकर्सना सुद्धा भेटले होते. अमित शाह यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या मेकर्सचा फोटो पोस्ट केला. ‘द साबरमती रिपोर्ट’च्या माध्यमातून सत्य समोर आणल्याबद्दल त्यांच्या धाडसाच कौतुक केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, “या चित्रपटातून खोटी आणि भ्रामक तथ्य उघडी पडली. सत्य काय ते समोर आलं. राजकीय हितासाठी ते सत्य दाबून ठेवण्यात आलं होतं”

कुठल्या-कुठल्या नेत्यांनी हा चित्रपट बघितलाय?

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट काही राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आपल्या राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. इतकच नाही, त्यांनी कॅबिनेटमधल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत बसून हा चित्रपट पाहिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा सुद्धा हजर होते. एकदिवस आधी केंद्रीय राज्य मंत्री भागीरथ चौधरी यांनी अजमेर येथे ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिला. या चित्रपटातून सत्य समोर आलय असं भागीरथ चौधरी म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *