‘ह्या कारणामुळे पंतप्रधानांनी माफी मागितली’, राहुल गांधी यांचा मोदींना टोला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला.

गेल्या साठ वर्षात त्यांनी तुमची माफी मागितली नाही. कारण गरज पडली नाही. ज्याने चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची. राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनीस कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण ही मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं. मेरीटमध्ये द्यायचं होतं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून माफी मागितली, असे राहुल गांधी म्हणाले.

शिवाजी महारांचं स्मरण म्हणून मूर्ती बनवली. पण ती उभी राहू शकेल एवढंही लक्ष दिलं नाही. पतंगराम कदम यांचा पुतळा बनवला. तुम्ही ५० वर्षानंतर या हा पुतळा असाच असेल. सर्वात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवतो. काही दिवसात भ्रष्टाचारामुळे, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने मूर्ती पडते.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. मोदींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही फक्त दोनच माणसांचं सरकार का चालवता. मोठी कंत्राट अदानी आणि अंबानीला मिळतात, अशीही टीका राहुल गांधींनी केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *