गर्भवती महिलेची 2 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील ब्राह्मी गावात एका गर्भवती महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील ब्राह्मी येथे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 वाजता घडली. पूजा मोहन नेमाने (25) आणि काव्या मोहन नेमाने (2) अशी मृतांची ओळख पटली आहे. या प्रकरणी पती मोहन रोडबा नेमाने (30), सासू रंजना रोडबा नेमाने (50) आणि रोडबा नेमाने यांच्याविरुद्ध लाडखेड पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारव्हा तालुक्यातील ब्राह्मी गावात गर्भवती महिला पूजा नेमान तिच्या २ वर्षांच्या मुली, पती, सासू आणि सासऱ्यांसह राहत होती. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 वाजता पूजाने तिच्या दोन वर्षांच्या मुलीला पोटाशी घट्ट बांधले. त्यानंतर दोघांनीही गावाजवळील मारुती दुधेच्या शेतात बांधलेल्या विहिरीत उडी मारली. खोल पाण्यात बुडून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. गावकरी मदतीसाठी धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच लाडखेड ठाणेदार विनायक लांगी आणि पोलीस उपनिरीक्षक रामकिशन जयभाई घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.या प्रकरणी पूजाच्या वडिलांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी तिचा पती मोहन आणि सासूविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *